विधायक कार्यांनी ना. गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांना विधायक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

वाढदिवसाचे सोहळे साजरे न करता लोकसेवा करावी अशीच शिकवण नामदार नाईक यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जनसेवेच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सन्मान, वृक्षारोपण अशा अनेक समोजोपयोगी कार्याचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रमंडळींतर्फे  आयोजन करण्यात आले.   

वाढदिवशी ना. गणेश नाईक यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी जनसागर लोटला होता. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे या मान्यवरांसह  सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, माजी मंत्री,  सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांनी आपले लाडके लोकनेते नामदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. असंख्य व्यक्तींनी दूरध्वनीवर आणि समाज माध्यमातून नाईक यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन केले. या सर्व सदिच्छा आणि आशीर्वाद आपणास यापुढील काळात  लोकसेवा करण्यासाठी प्रेरणा देतील, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. 

राज्यात वनीकरणाचे प्रमाण वाढवून राज्यातील महामार्गाच्या दुतर्फा  सुरंगी, सोनचाफा अशा प्रकारच्या सुगंधी वृक्षांचे रोपण करून हे रस्ते  सुगंधी आणि सप्तरंगी करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चाविंद्रा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी