मेट्रो कामामुळे पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

कल्याण : २२ डिसेंबर रोजी दुपारी कल्याण शीळ रोडवरील काटई नाक्याजवळ ‘एमआयडीसी'ची पाण्याची मोठी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. मेट्रो कामामुळे मागील दोन महिन्यातील सदरची तिसरी घटना आहे.  

मेट्रो कामामुळे कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण व्हायला कमीतकमी ५ वर्ष लागणार आहे. तोपर्यंत या ‘मेट्रो'चा फटका जनतेला बसणारच. पाईपलाईन फुटल्याने डोंबिवली एमआयडीसी आणि आजुबाजुच्या ग्रामीण परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईत स्वच्छता पाहणी