डोंबिवली मध्ये शिवस्मारक नुतनीकरण सोहळा
डोंबिवली : अनेक वर्षांपूर्वी डोंबिवली शहरातील मानपाडा रोड शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. छत्रपती शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीसह सिंहासनारुढ प्रतिमा शिवस्मारकात विराजमान करण्यात आली आहे. ‘किल्ले रायगड'च्या मेघडबंरीतील हुबेहुब शिवमूर्तीचे अनावरण पार पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला डोंबिवली मधील शिवगर्जना, ढोल-ताशा, लेझीम, घोडेनृत्याच्या पार्श्वभूमीवर सदर सोहळा पार पडला.मानपाडा रोडवरील शिवसेना शाखेसमोरील पुतळ्याचे नुतनीकरण करण्यात आले. हुबेहूब ‘किल्ले रायगड'वरील मेघडबंरीतील राजबिंडे शिवरायांचे दर्शन घेण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार आला. या लोकार्पणप्रसंगी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, माजी आमदार आप्पा शिंदे, सुरेश जोशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख लता पाटील, कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील, तालुकाप्रमुख महेश पाटील, गुलाब वझे, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, सागर जेधे, संतोष चव्हाण, माजी नगरसेवक संजय पावशे, दत्ता वझे, जयंता पाटील, शीतल लोके, कविता गांवड, शिल्पा मोरे, आदि उपस्थित होते.