प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अवयव प्रत्यारोपण विषयक चर्चासत्र, परिसंवाद उत्साहात संपन्न
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत समुचित प्राधिकारी (माअप्र) तथा उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांच्यामार्फत अवयवदान या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्र आणि परिसंवादासाठी परिमंडळातील तिन्ही जिल्ह्यांमधील (ठाणे, रायगड, पालघर) जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका), वैद्यकीय अधीक्षक, नोंदणीकृत सर्व एनटीओआरसी आणि ट्रान्सप्लान्ट सेंटर, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणिा इतर नामांकित खाजगी रुग्णालये येथील तज्ञ डॉक्टर आणी इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अवयवदान-श्रेष्ठ दान असा संदेश अधोरेखित करणारा सदर कार्यक्रम आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे समुचित प्राधिकारी (माअप्र) तथा उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला.
या परिसंवादात अवयवदानाची सामाजिक गरज, कायदेशीर बाबी, अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया तसेच प्रभावी जनजागृतीद्वारे अवयवदान चळवळ अधिक बळकट कशी करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शक आणि चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत होणारे अवयवदान व मागणी यामधील मोठी तफावत लक्षात घेता मृत्युपश्चात अवयवदानाला प्रोत्साहन देण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच, परिमंडळातील आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर असलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांनी पुढे येऊन एनटीओआरसी म्हणून नोंदणी करावी. तसेच नोंदणीकृत प्रत्यारोपण केंद्रांनी देखील अवयवदानात त्यांचे काम सुधारण्याचा प्रयत्न करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
यावेळी डॉ. सचिन जाधव, विशेष कार्य अधिकारी, मा. मंत्री सार्वजनिक आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्रालय, मुंबई, डॉ. अभिजीत फडणीस, सहाय्यक संचालक (माअप्र), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष, विभागीय अवयव समन्वय केंद्र, मुंबई तसेच डॉ. भरत शहा, सचिव, विभागीय अवयव समन्वय केंद्र, मुंबई यांची उपस्थिती लाभली.
परिसंवादात मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४ (द ट्रान्सप्लान्टेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स ॲवटत) या कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, असे आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे समुचित प्राधिकारी (माअप्र) तथा उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी कळविले आहे.