नागरी सुविधांसाठी असलेला भूखंड बिल्डरला देण्याचा घाट

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-२८ येथील ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड गार्डन, मैदान, पोलीस ठाणे, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक यासाठी आरक्षित भूखंड ‘सिडको'ने गामी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. याला विरोध करण्यासाठी १४ डिसेंबर रोजी ‘मनसे'ने नेरु मध्ये ‘बाइक रॅली'चे आयोजन केले होते.

नेरुळ, सेक्टर-१ येथील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. त्यानंतर नेरुळ, सेक्टर-१, नेरुळ रेल्वे स्थानक, नेरुळ सेक्टर-१, राजीव गांधी ब्रिज, समाधान हॉटेल, नेरुळ गाव, ज्वेलस्‌ गार्डन अशी रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर उपस्थित जनसमुदायाला मनसे प्रवक्ते तथा शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी संबोधित केले. नवी मुंबई महापालिका आयुक्त या भूखंडावर फलक लावणार होते त्याचे काय झाले? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला. तसेच येत्या काही दिवसांत जर महापालिकेने फलक लावला नाही तर मनसे भीक मागो आंदोलन करेल आणि ते पैसे आयुक्तांना देण्यात येईल, असा इशारा काळे यांनी यावेळी दिला.

‘मनसे'ची सदर रॅली यशस्वी होण्यासाठी शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्यासह शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सहसचिव अभिजीत देसाई, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, महिला सेना उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूल, विभाग अध्यक्ष विशाल गाडगे, अनिकेत भोपी, निखिल गावडे, उमेश गायकवाड, अक्षय भोसले, अमोल आयवळे, शाम ढमाले, चंद्रकांत डांगे यांनी आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मिरा-भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमीपुजन, लोकार्पण