शाळा-महाविद्यालयांमधून १३०० किलो प्लास्टिक संकलन
नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभाग वाढीवर विशेष भर देण्यात येत आहे. अभियान कालावधीत प्रत्येक दिवशी करावयाच्या उपक्रमांचे कॅलेंडर तयार करण्यात आले असून त्यानुसार महापालिका क्षेत्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक संकलनाची विशेष मोहीम महापालिका क्षेत्रातील ५६ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नमुंमपा शिक्षण विभागाच्या सहयोगाने यशस्वीपणे राबविण्यात आली.
याद्वारेे ५६ शाळा-महाविद्यालयांमधून एकूण १३६४ किलो प्लास्टिक संकलन करण्यात आले. यामध्ये एकल वापराचे प्लास्टिक, चॉकलेटचे रॅपर, सॅशे, प्लास्टिक बॉटल्स, फुड कंटेनर तसेच घरातील प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू अशा विविध प्रकारच्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या प्लास्टिक कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करुन नवीन आकर्षक वस्तुंची निर्मिती करण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये एमईएसविद्यामंदीर बेलापूर, ज्ञानदीप सेवा मंडळ (इंग्रजी माध्यम) करावे, नमुंमपा शाळा क्र.११७ दिवाळेगाव, शाळा क्र.२ दिवाळेगाव, शाळा क्र.११२ करावेगांव, गुड शेफर्ड विद्यालय, विद्याभवन विद्यालय नेरुळ, शाळा क्र.९ नेरुळ, शाळा क्र.९२ कुकशेत, शाळा क्र.१० नेरुळगांव, तेरणा विद्यालय नेरुळ, शाळा क्र.९८ (सीबीएससी), शिरवणे विद्यालय-ज्युनियर कॉलेज, एपीजे विद्यालय नेरुळ, टिळक कॉलेज नेरुळ, नमुंमपा शाळा क्र.1६ शिवाजीनगर, नमुंमपा शाळा क्र.1८ सानपाडा, नमुंमपा शाळा क्र.30 कोपरी, आयईएस विद्यालय-वाशी, रेयॉन विद्यालय-वाशी, सेंट मेरीज् तेजस्विनी विद्यालय, शाळा क्र.९१, डिएव्ही विद्यालय, शाळा क्र.७२ कोपरखैरणे, शाळा क्र.३१ कोपरखैरणे, शाळा क्र.८१ (ऊर्दू माध्यम) कोपरखैरणे, शाळा क्र.१०९ कोपरखैरणे, शाळा क्र.११५ कोपरखैरणे, शाळा क्र.१०६ कोपरखैरणे, आयसीएसई विद्यालय, रा. फ. नाईक प्राथमिक विद्यालय, नमुंमपा हिंदी शाळा घणसोली, शेतकरी विद्यालय घणसोली, शाळा क्र.४२ घणसोली, तळवली विद्यालय, शाळा क्र.४६ गोठवली, शाळा क्र.४७ रबाले, शाळा क्र.९१दिवा-ऐरोली, शाळा क्र.१०३ ऐरोली, ज्ञानदिप विद्यामंदिर ऐरोली, सुशिलादेवी देशमुख विद्यालय ऐरोली, श्रीराम विद्यालय-ज्युनियर कॉलेज ऐरोली, शाळा क्र.४९ ऐरोली, शाळा क्र.७७ ऐरोली, शाळा क्र.१०८ दिघा अशाप्रकारे बेलापूरपासून दिघा पर्यंत विविध शाळा महाविद्यालयांचा समावेश होता.