‘एअर इंडिया'ची नवी मुंबई विमातळावरुन दररोज २० उड्डाणांची घोषणा
मुंबई : ‘एअर इंडिया समूह'ने लवकरच सुरु होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (एनएमआयए, आयएटीए कोडः एनएमआय) व्यावसायिक उड्डाणे सुरु करण्याची योजना जाहीर केली आहे. सदर योजना विमानतळाच्या कार्यसंचालनाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळ ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि.'द्वारे चालविले जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या कार्यान्वयनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘एअर इंडिया'ची व्हॅल्यू कॅरियर एअर इंडिया एक्सप्रेस ‘एनएमआयए'पासून ‘एनएमआयए'पर्यंत दररोज २० दैनिक उड्डाणे किंवा ४० हवाई वाहतूक हालचाली (एटीएम) चालविणार आहे. त्याद्वारे भारतातील १५ शहरे जोडली जाणार आहेत. एअर इंडिया समूह २०२६ च्या मध्यापर्यंत दररोज ५५ उड्डाणे (११० एटीएम-एअर ट्रॅफीक मुव्हमेंट) वाढवण्याची शक्यता आहे. त्यात नवी मुंबईतून दररोज ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांंचा समाविष्ट असेल. तर २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत नवी मुंबईतून दररोज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ६० उड्डाणे (१२० एटीएम) करण्याचे ‘एअर इंडिया'चे उद्दिष्ट आहे.
सदर सहकार्य एअर इंडिया समूहाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या तसेच २०३० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई प्रवासी बाजारपेठ बनण्याच्या भारताच्या स्वप्नाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.
नवी मुंबई विमानतळ'मध्ये ‘एअर इंडिया एक्सप्रेस'च्या नियोजित ऑपरेशन्समुळे मुंबई महानगर प्रदेशापासून (एमएमआर) भारताच्या आणि बाहेरील ठिकाणांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होईल. तसेच एनएमआयएद्वारे अखंड आंतरराष्ट्रीय वाहतूक वाढेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ५ टप्प्यात बांधले जात आहे. त्याच्या कार्यान्वयाच्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना (एमपीपीए) सामावून घेण्याची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) मालवाहतूक करण्याची अपेक्षा आहे. ‘नवी मुंबई विमानतळ'चे काम पूर्ण झाल्यावर तिथे ९० एमपीपीए सेवा देण्याची आणि दरवर्षी ३.२ एमएमटी मालवाहतूक करण्याची क्षमता असेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यान्वयन सुरु करण्यास आम्ही उत्सुक आहोत. मुंबई शहर एकापेक्षा जास्त विमानतळांसह जगातील शहरांच्या यादीत सामील होत आहे. एनएमआयए केवळ उर्वरित भारताशी जोडणारा दुवा राहणार नाही, तर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हींसाठी देशातील महत्त्वाचे जागतिक केंद्र म्हणून त्याची उभारणी होत आहे. एअर इंडिया समूहात आम्हाला पश्चिमेकडील, पूर्वेकडील आणि त्यापलिकडे भारताला जोडताना अभिमान वाटतो. ‘नवी मुंबई विमानतळ'मधील आमचा विस्तार जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताच्या वाढीला पाठिंबा देईल.
-व्ॉÀम्पबेल विल्सन, सीईओ तथा एमडी -एअर इंडिया.
आमच्या महत्वपूर्ण एअरलाईन भागीदारांपैकी एक म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एअर इंडिया ग्रुप'चे स्वागत आहे. ‘एअर इंडिया'च्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आणि जागतिक दृष्टीकोन ‘एनएमआयए'ला जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एक मानक बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी पूर्णपणे सुसंगत आहेत. सदर भागीदारी मुंबईच्या कनेक्टिव्हिटी लँडस्केपची नव्याने व्याख्या करेल. प्रवाशांसाठी कार्यक्षमता आणि सर्वोत्तम अनुभव वाढविण्यासाठी ‘नवी मुंबई विमानतळ'ने तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने येणाऱ्या दशकांमध्ये अखंड आणि उत्कृष्ट प्रवास प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
-अरुण बन्सल, सीईओ-अदानी एअरपोर्ट होल्डींग लि.