प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव देण्याची मागणी
भिवंडी; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र शासनाकडे लावून धरली आहे. यासंदर्भात खा. सुरेश म्हात्रे यांनी १३ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना आपल्या मागणीचे लेखी निवेदन दिले.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली असता, मुख्यमंत्र्यांनी आपण ‘दिबां'च्या नावाबाबत सकारात्मक असल्याचे पुन्हा आश्वासन दिले आहे. मात्र, विमानतळ सुरू होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही शासनाकडून ‘दिबां'च्या नावाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे २२ डिसेंबर रोजी स्थानिक भूमिपुत्र पदयात्रा आंदोलन करणार यावर आम्ही ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.