२७ हजार पनवेलकरांचे महाश्रमदान

पनवेल : पनवेल महापालिकेमार्फत एक दिन एक तास एक साथ मोहिमेअंतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहिमेचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले. केंद्र शासनाच्या स्वच्छोत्सव-स्वच्छता ही सेवा अभियान अनुषंगाने स्वच्छता महाश्रमदान मोहीम घेण्यात आली.

या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेच्या चारही प्रभागामध्ये विविध २२ ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये सुमारे २७ हजार नागरिकांनी सक्रिय श्रमदान केले. या विशेष मोहिमेचा मुख्य कार्यक्रम खांदेश्वर तलाव येथे घेण्यात आला. याठिकाणी आ. प्रशांत ठाकूर तसेच इतर लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, शाळा इत्यादींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या उपक्रमांतर्गत सुमारे ६४ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका मार्फत साजरा करण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा या अंतर्गत ‘स्वच्छोत्सव-२०२५' मध्ये नागरिकांनी या पध्दतीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेंमध्ये पनवेल प्रभागांतर्गत काळसेकर कॉलेज, केएलई कॉलेज, सीकेटी कॉलेज, आगरी शिक्षण संस्था, आनंदी क्लब, बँडमिंटन क्लब खांदा कॉलनी, बीटीसी लॉ कॉलेज, रायन स्कुल, पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आयटीआय पनवेल, व्हीके हायस्कुल, काळुंद्रे-भिंगारी जिल्हा परिषद, गणेश विद्या मंदिर, उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, सरस्वती महिला बचत गट, कफ नगर स्वयंसेवी संस्था, वंदे मातरम्‌ इको चालक संघटना अशा विविध शाळा, सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला.

खारघर प्रभागामध्ये श्री राम समर्थ महिला बचत गट, गावदेवी महिला मंडळ, जय गुरूदेव संघटना, रामशेठ ठाकूर महाविद्यालय, रायगड जिल्हा परिषद शाळा खुटारी, तोंडरे, सरस्वती कॉलेज, उड्डान संस्थांनी सहभाग घेतला. तर कळंबोली प्रभागामधील स्वछता मोहिमेंमध्ये रविशेठ पाटील सामाजिक मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, आरआर डब्लू संघटना, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शाळज्ञ, बारकूबाई नामदेव पाटील शाळा, डी. जी. तटकरे स्कुल, न्यू मुंबई इंग्लिश स्कुल, केएलई कॉलेज अशा विविध शाळा व संघटनांनी सहभाग नोंदविला. तसेच कामोठे प्रभागातील स्वछता मोहिमेंमध्ये मैत्री कट्टा ग्रुप, सागर पाटील प्रतिष्ठान, बालाजी ग्रुप, ॲक्टीव्ह सिटीझन कौन्सील, छाबा फाऊंडेशन, कफ संस्था, राष्ट्रीय जन स्वास्थ संस्था प्रशिक्षण आणि अनुसंस्थान संस्था अशा विविध शाळा आणि संघटनांनी सहभाग नोंदविला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विमानतळावर सुरक्षिततेसाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखेची गरज