‘जनता दरबार' उपक्रम ठरतोय जनतेचा आधार

नवी मुंबई : नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेणारे राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या ‘जनता दरबार' उपक्रमाला नवी मुंबई शहरात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, ‘जनता दरबार'  उपक्रम नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून संबंधित विभागांना त्वरित सूचना देण्याची ना. गणेश नाईक यांची कार्यपध्दती लोकाभिमुख प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण मानली जात आहे.
 
याच जनता दरबारात सानपाडा विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले समाजसेवक निलेश छाया सोमाजी कचरे यांनी अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने विविध प्रश्न मांडले. स्थानिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करुन समस्यांसोबत त्यावर व्यवहार्य उपाययोजनांचे देखील निलेश कचरे यांनी स्पष्टपणे सादरीकरण केले.
 
सानपाडा गावठाण भागात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रमुख मुद्दा असून, अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या कचरा वाहनांना प्रवेश मिळत नसल्याने नियमित कचरा संकलनात अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून अंतर्गत रस्त्यांमध्येही प्रभावी स्वच्छता शवय होण्यासाठी छोट्या तीन चाकी कचरा संकलन वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी यावेळी निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांच्याकडे केली.
 
सानपाडा मध्ये वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग गंभीर समस्या बनली असून, रस्ते अरुंद झाल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यासाठी संपूर्ण ट्रॅफिक ऑडिट, नो-पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी, ऑड-इव्हन पार्किंग प्रणाली तसेच रस्त्यांचे योग्य नियोजन करण्याचे उपाय निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांना सुचविले.
 
याच अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणांना होणारा विलंबाचा अत्यंत गंभीर मुद्दा अधोरेखित करण्यात आला. रुग्णवाहिका आणि  अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता न आल्याने जीवितहानीचा धोका निर्माण होत आहे. यासाठी इर्मजन्सी कॉरीडॉर आणि प्रायोरिटी रुट्‌स निश्चित करून ते कायमस्वरुपी मोकळे ठेवण्याची गरज निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांच्यासमोर व्यवत केली.
 
सानपाडा पोलीस ठाणे पाम बीच येथे स्थलांतरित झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे ‘जनता दरबार' मध्ये निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांची उपस्थिती कमी झाल्यामुळे चोरी आणि गुन्हेगारी वाढल्याची बाब समोर आली असून, यावर उपाय म्हणून सानपाडा सेक्टर-८ येथील जुन्या ठिकाणी पोलीस चौकी सुरु ठेवण्याची आणि  नियमित पेट्रोलिंग वाढविण्याची निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांच्याकडे घेली. यासोबतच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ‘आदर्श गाव' आणि ‘आदर्श विभाग' स्पर्धा सुरु करण्याचा नाविन्यपूर्ण प्रस्ताव निलेश कचरे यांनी ना. गणेश नाईक यांच्याकडे सादर केला. या उपक्रमामुळे स्वच्छता, वाहतूक शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक सहभाग यांना प्रोत्साहन मिळून प्रत्येक विभागात सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन नवी मुंबई शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी निलेश कचरे यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान, ना. गणेश नाईक यांनी सानपाडा विभागातील नागरिकांच्या हितासाठी सादर करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार तसेच संबंधित पोलीस प्रशासनाकडे विषय वर्ग करुन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या तत्पर आणि निर्णयक्षम कार्यपध्दतीमुळे सानपाडा विभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिवि्रÀया समाजसेवक निलेश कचरे यांनी व्यवत केली.
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पुल प्रकल्पातील बाधित नागरिकांना दिलासा