‘नगरपरिषद'मध्ये माहिती अधिकारी दिन साजरा
अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'मध्ये २९ सप्टेंबर रोजी माहिती अधिकारी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व, पारदर्शक व जबाबदार प्रशासन घडविण्यात त्याचे योगदान तसेच नागरिकांच्या हक्कांची जाणीव या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ‘नगरपरिषद'चे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी उमेश राऊत, लेखाधिकारी प्रवीण वडगये, लेखापरीक्षण अधिकारी किरण तांबारे, शहर अभियंता संजय कुंभार यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे शासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढल्याचे सांगितले. नागरिकांना माहितीचा हक्क मिळाल्यामुळे लोकशाही अधिक सक्षम झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माहिती सहाय्यकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.