‘केडीएमसी'चा आगळा-वेगळा उद्यान प्रकल्प

कल्याण : कल्याण-डोंबविली महापालिकातर्फे आगळा-वेगळा प्रकल्प साकारला जात असून यामध्ये आता महापालिका क्षेत्रातील बारावे (रिंग रोड लगत) परिसरात ऑटिजम व्हिलेज व्हिलेज साकारले जात आहे.

सदर ऑटिजम व्हिलेज व्हिलेज सुमारे १२,७७२ चौरस मीटर इतक्या परिसरात तयार होत असून ऑटिजम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात बाजुस ऑटिजमग्रस्त मुलांसाठी ऑटिजम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजुला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे.

या ऑटिजम व्हिलेज मध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी सेंसरी गार्डन, सेंसरी पाथवे, सेंसरी मेडीटेशन सेंटर, थेरपी, आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे महापालिका आणि एमएमआर रिजन मधील ऑटिजम रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे .

उर्वारित भागात भव्य उद्यान, आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट, अम्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया , टॉयलेट, सोलर सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे ऑटिझम व्हिलेज मीर रिॲल्टीया विकासकांमार्फत ॲमिनिटी टीडीआर मधून तयार होत असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सदर स्थळी पाहणी करुन २ एप्रिल रोजी वर्ल्ड ऑटीझम अवेरनेस डे”ला या ऑटिझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करणे बाबत संबंधितांना निर्देश दिले तसेच दर सप्ताहात स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी सहा. संचालक नगररचना संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विकासक सुदेश मोर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे आणि कन्सल्टंट सुरज पाटील उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवयव प्रत्यारोपण विषयक चर्चासत्र, परिसंवाद उत्साहात संपन्न