‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग'च्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार

मुंबई : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग'च्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग'चे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विधी-न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट