मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
कोणताही राजकीय पक्ष, धर्म, जात, संप्रदाय, जातिविशेष यांच्या बाजूने न राहता जे योग्य आहे, रास्त आहे, चांगले आहे, जनहिताचे आहे त्याची पाठराखण करण्याची आपलं नवे शहरची भूमिका प्रारंभापासूनच कायम राहिली आहे. त्यामुळे या वृत्तपत्रास सुरुवातीपासूनच चांगला जनाधार मिळत गेला. नवी मुंबई महानगरपालिका असो, की पनवेल महानगरपालिका किंवा उरण नगर परिषद.. तसेच परिसरातील विविध ग्रामपंचायती हद्दीत येणारी विविध गावे व तेथील कामकाज, लोकहिताची कामे, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांनी केलेले कार्य, शासन यंत्रणांचे विविध अधिकारी यांच्या चांगल्या कामांची नेहमीच आपलं नवे शहरने दखल घेऊन त्यांना यथोचित प्रसिध्दी दिली आहे. त्यामुळे या साऱ्यांचा स्नेह प्रारंभापासूनच या वृत्तपत्राला लाभत गेला.
१ मे १९९४ रोजी जेंव्हा हे वृत्तपत्र सुरु झाले तेंव्हा नवी मुंबई महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधीही निवडून गेले नव्हते. महापालिका सभागृह अस्तित्वात यायचे होते. बोटावर मोजण्याइतकीच वृत्तपत्रे या भागातून निघत असत. काळाच्या ओघात त्यातील अनेक बंद पडली; तर अनेकांनी ती दुसऱ्यांच्या हाती ती सोपवली. मात्र २७ वर्षे एकाच प्रकाशन व्यवस्थेने वाचकांशी, या शहराशी असलेल्या निष्ठेने व मोठ्या आस्थेने सुरु ठेवलेले प्रारंभीचे साप्ताहिक असलेले आपलं नवे शहर हे १५ डिसेंबर २००९ पासून दैनिक बनले व वाचक, लेखक, जाहिरातदार, लोकप्रतिनिधी, शासनयंत्रणा या साऱ्याच्या आणखी निकटचे होऊन गेले.
केवळ बातम्या, लेख, जाहिराती, फोटो छापून अंक स्टॉलवर आणणे एवढ्याच मर्यादित अर्थाने आपलं नवे शहर वृत्तपत्र सुरु केले नसल्याने वर्षभरातील गुणीजनांच्या कामाची स्वतःहून दखल घेत उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार, खेळाडू, समाजकारणी, कर्तबगार व्यक्तिमत्वे, समाजाप्रति समर्पित स्वयंसेवी संस्था, पोलीसकर्मी अशांचा नवे शहरने वर्धापनदिन सोहळ्यात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्माननिधी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते जाहिर गौरव करण्याची परंपरा कायम जोपासली आहे. अलिकडे आपलं नवे शहरने सुरु केलेल्या विविध नव्या सदरांना वाचकांचा दांडगा प्रतिसाद लाभत आहे, हे सुचिन्हच होय.
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.