१७.९६ लाखांचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द
नवी मुंबई : बेलापूर परिमंडळ-२ अंतर्गत असलेल्या सीबीडी, नेरुळ आणि एनआरआय सागरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळविलेला तब्बल १७ लाख ९६ हजार रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल बेलापूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते मूळ मालकांना (फिर्यादी) सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या नेरुळ, एनआरआय आणि सीबीडी पोलीस ठाण्यात मागील वर्षाभरामध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करुन सुमारे १७ लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हाच मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी परिमंडळ-२ बेलापूरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार, नेरुळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी चोरीला गेलेली वाहने, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठ्या संख्येने हरवलेले मोबाईल फोन यांचा समावेश होता. नेरुळ पोलिसांनी सर्वाधिक ९.२५ लाखांचा मुद्देमाल परत केला. यात सोने, चांदी, रोख रक्कम आणि १७ मोबाईलचा समावेश आहे. एनआरआय सागरी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे ३१ हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत. तर सीबीडी पोलिसांनी १ रिक्षा आणि १५ मोबाईलसह एकूण २.७१ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द केला आहे.
या तिन्ही पोलीस ठाण्यांनी ११ गुह्यांची उकल करुन एवूÀण ५९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या सर्व मोबाईल फोनची एवूÀण किंमत ९ लाख २१ हजार इतकी आहे. तसेच या गुन्ह्यातील ८ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपला हरवलेला मोबाईल किंवा चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले. दरम्यान, नागरिकांनी सतर्क रहावे. कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मोबाईल हरवल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.