म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
महिला दिनी योग शिबिरातून महिलांना प्रशिक्षण
कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोनक सीटी कल्याण पश्चिम येथे महीलांसाठी योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गृहीणी असो अथवा नोकरी करणारी महीला या दिवसभराचा मोठा कालखंड म्हणजे सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत ती सतत संसार-नोकरी-प्रवास यामध्ये व्यस्त असते. तीची तारेवरची कसरत वर्षाचे ३६५ दिवस चालू असते. अशी महिलांनी स्वतःकडेही लक्ष द्यावे हा हेतू या आयोजनामागे होता. जेणेकरुन आपल्या संसाराचा नोकरीचा गाडा हाकण्यासाठी महिला तंदुरुस्त राहु शकतील. सदर योग शिबीरात योगासनांचे प्रशिक्षण सौ.रिंकु बाबु आव्हाड यांनी दिले.
या प्रशिक्षणात लहान मुलींपासुन ज्येष्ठ महीलांपर्यंत विविध वयोगटातील महीलांनी सहभाग घेतला होता. त्यात कु.वेदीका आव्हाड, श्रावणी वाघ, शरण्या बुंट्टे, वैदीका पिलेवार, सौ.योजना पाटील, सौ.रोहीणी रेडेकर, सौ.नलिनी बुंट्टे, सौ. वर्षां महाजन, सौ. स्नेहल कानडल, सौ.शुभांगी शिंपी, सौ.शुभांगी जाधव, सौ. सुवर्णा गाजरे, सौ. अर्चना अमोदकर, सौ.मिनल घ्यार, सौ.गौरी, सौ.पुजा टलरेजा, सौ.राघिणी वाघ, सौ.अनुसया रेडेकर आदिंचा समावेश होता. सदर योग शिबीरात सुर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, प्राणायाम, अनुलोन विलोन, कपालभाती, भ्रमरी, बटरपलाय, स्ट्रेचिंग,मेडीटेश असे विविध प्रकारचे प्रात्यक्षिके सौ.आव्हाड यांनी स्वतः केली व प्रशिक्षणार्थ्यांकडून करवून घेतली.