प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
दिवा स्थानकाशेजारी कचऱ्याचे ढीग
दिवा : दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्यामुळे स्टेशन परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली चित्र दिसत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे. तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.
या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी तसेच रोज मुंबई, वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
-स्थानिक दुकानदार