इतिहासाच्या पाऊलवाटेवर बहु सांस्कृतिक ठाणे

ठाणे ः १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘बहु सांस्कृतिक ठाणे' या ‘हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘हेरिटेज वॉक'ची सुरुवात सुप्रसि्‌इ पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली. त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला.
या ‘हेरिटेज वॉक'मध्ये अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, तहसिलदार सचिन चौधर, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक गिरीश काळे, आर्किऑलॉजिस्ट गौरी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रध्दा तळेकर, आदि उपस्थित होते.
या ‘हेरिटेज वॉक' दरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोख बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तुचे ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तुविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याचे संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना जेष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव तेटविलकर, ‘इंटॅक'च्या सहसंयोजक ॲड. दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिध्द निवेदिका मानसी आमडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सर्वांची मोलाची साथ लाभली.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ‘हेरिटेज वॉक'चे अतिशय उत्कृष्ट नियोजन तहसिलदार सचिन चौधर आणि ‘अश्वमेध प्रतिष्ठान'चे संस्थापक, पुरातत्व अभ्यासक आणि मानद वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य अविनाश हरड यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला