ज्ञान विकास विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

नवी मुंबई : ज्ञान विकास विद्यालय, कोपरखैरर्णे येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला मेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून सातारा जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या सौ. कविताताई धनावडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान सौ. प्रेरणाताई पाटील यांनी भुषवले.

ज्ञान विकास प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान जगन्नाथ दळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शालेय प्रगतीचा व वाटचालीचा आढावा घेतला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, शिक्षक पालक संघातील महिला पालकांना गौरवण्यात आले.या मेळाव्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थीनी व पालकांनी सहभागी घेतला होता. महिला शिक्षक व महिला पालक यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. जयश्री बागडे यांनी केले.शेवटी उपस्थित मान्यवर, महिला पालक व विद्यार्थीनी यांचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ची मालमत्ता कर थकबाकींदारांसाठी अभय योजना