पनवेल पंचायत समिती सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील
सीवूड्सच्या टिळक स्पोर्ट्सप्लेक्समध्ये वार्षिक महोत्सवाचा समारोप
नवी मुंबई : सीवूड्स येथील टिळक एस. के. कॉलेजच्या “तत्व” या आठवडाभर चाललेल्या वार्षिक महोत्सवाचा समारोप टिळक स्पोर्ट्सप्लेक्समधील भव्य संगीत संध्येने झाला. पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उत्साही उपस्थितीने रंगलेल्या या कार्यक्रमात कलश म्युझिकच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. रॅप कलाकार मुझम्मिल आणि फरार यांनी प्रभावी परफॉर्मन्स देत वातावरणात रंगत भरली. टायगर पॉपच्या पॉप-डान्सने आणि नवदीप बसरा यांच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रम बहारदार बनला.
समारोपाचे मुख्य आकर्षण ठरला लोकप्रिय गायक संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स. त्यांच्या चार्टबस्टर गाण्यांनी आणि उत्स्फूर्त संवादाने सभागृहात जल्लोषाची लहर उसळली. विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठी ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.