प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
भोंदूबाबाच्या निषेधार्थ बेलापूर नेरूळ शाखेची प्रभात फेरी
नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेरूळ आणि बेलापूर शाखेच्या वतीने नेरुळ येथील ज्वेल गार्डन येथे भोंदू बाबा खरातच्या निषेधार्थ प्रभात फेरीचे आयोजन १ एप्रिल रोजी करण्यात आले होते. निषेध व जनजागृती करणारे फलक हाती घेऊन प्रभात फेरी काढत पत्रक वाटप पार पडले. यावेळी सुमारे ६०० पत्रके वाटण्यात आली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कामाबद्दल अनेकांनी उत्सुकता दाखवली.
रमेश साळुंखे यांनी पुढाकार घेऊन उत्कृष्ट आयोजन केले होते. या फेरीत रमेश साळुंखे, बालाजी शिंदे, आशुतोष साळुंखे, सुनीता साळुंखे, सौरभ कुलकर्णी, आलोक देशपांडे, लेखा देशपांडे, त्रिशिला कांबळे, भास्कर पवार, डॉ. शेख, डॉ.रेणके, फुलचंद शिंदे, राजीव देशपांडे, वाघ, सचिन आदी कार्यकर्ते हजर होते. अशा आज व उद्याही प्रकारची प्रभात फेरी सीबीडी बेलापूर आणि खारघर उत्सव चौक येथे आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.