प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पनवेल पालिकेच्या तापयात अत्याधुनिक वाहने दाखल
पनवेलः ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल' या ध्येयाने वाटचाल करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. २ एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अत्याधुनिक ६ स्काय लिपट वाहने, ४ लिटर पिकर मशीन आणि २ मेकॅनाइज्ड स्वीपिंग मशीनचा लोकार्पण सोहळा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहासमोरील प्रांगणात उत्साहात पार पडला. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही यंत्रे घेण्यात आली आहेत.
या सोहळ्याला महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, शिवसेना (उबाठा) गटनेत्या लिना गरड, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार असून, शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
वाहनांची वैशिष्ट्ये
व्हॅक्यूम प्रणालीद्वारे कचरा थेट कंटेनरमध्ये संकलित होतो. ३००० लिटर क्षमतेच्या या मशीनमुळे अरुंद आणि कठीण जागीही स्वच्छता करणे सोपे होईल. एकूण ४ मशीन्स खरेदी केल्या असून प्रत्येकीची किंमत सुमारे ६० लाख रुपये आहे.शहरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी १६ टन क्षमतेची दोन यंत्रे दाखल झाली आहेत. व्हॅक्यूम असिस्टेड ड्राय आणि वेट क्लिनिंग प्रणाली. झ्श्-१० आणि झ्श्-२.५ धूलिकण रोखण्यासाठी प्रगत फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर. ताशी ५ ते १० किमी वेगाने ही यंत्रे स्वच्छतेचे काम करणार आहेत.उंच ठिकाणच्या कामांसाठी ६ नवीन वाहने तापयात आली आहेत, जी ३६० अंशात फिरू शकतात.३ वाहने वृक्ष प्राधिकरण विभागासाठी आणि ३ वाहने विद्युत विभागासाठी राखीव.पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्यांची छाटणी करणे आणि हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती करणे यासाठी १५ ते १८ मीटर उंचीच्या या लिपटचा वापर होईल.
या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे पनवेल शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक गतिमान होईल. नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
-डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका