नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून २६.४८ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट  

पनवेल : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करुन मागील वर्षभरात जप्त केलेले तब्बल २६.४८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ २६ सप्टेंबर रोजी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, एलएसडी पेपर यासारख्या घातक अंमली पदार्थांचा समावेश आहे. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, पोलीस सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ, आदि उपस्थित होते.  

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि विविध पोलीस स्टेशनने गेल्या २ वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवगळ्या कारवाया करुन मोठया प्रमाणात अंमली पदार्थ पकडले होते. एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, एलएसडी पेपर यासारख्या घातक अंमली पदार्थाचा यात समावेश आहे. नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा एक भाग म्हणून २६ सप्टेंबर रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील तब्बल २६.४८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीतील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा केंद्रात शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनी या अगोदर, गत फेब्रुवारी पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात ७९ गुन्ह्यांमधील तब्बल ११ कोटी ६१ लाख रुपयांचा अंमली पदार्थ नष्ट केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल मधील स्वप्नालय बालगृहातून पाच मुलींचे पलायन;