प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘सिडको'चे सर्वात महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला गेला आहे. ‘सिडको'ची दूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे ते भव्य प्रतिक असून उद्या २५ डिसेंबर २०२५ रोजी येथून पहिली विमानसेवा सुरु होत आहे. नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.
विमानतळ प्रकल्पामध्ये नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यान्वयनापर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामध्ये अत्यंत काटेकोर नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, नियोजित मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
या ऐतिहासिक टप्प्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करताना ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलयांनी नवी मुंबईकरांसह महाराष्ट्रातील आणि देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रत्यक्ष उड्डाण जनतेच्या दीर्घकाळच्या स्वप्नाची पूर्तता असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सिडको'ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह, तसेच एनएमआयएएल यांचेही आभार नोंदविले आहेत. सदर भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतिक ठरते.
महाराष्ट्र शासनाने ‘सिडको'सोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टीची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदानी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे.
नवी मुंबई विमानतळ काय्रान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृध्दी आणि औद्योगिक आणि व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे.
अत्याधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक रचना आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत, देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे महाराष्ट्र शासन आणि ‘सिडको'ची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. विमानतळ प्रकल्प ‘सिडको'च्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटीबध्दता अधोरेखित करतो. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.
नवी मुंबई विमानतळ पहिल्या दिवशीची विमानसेवा (२५ डिसेंबर २०२५) :
एकूण विमान संचालन -पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मुव्हमेंटस्
विमान कंपनी - इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर, स्टार एअर
उड्डाण वेळाः
पहिले आगमनः ६ ई ४६० बेंगळुरू येथून सकाळी ८.०० वाजता
पहिले प्रस्थानः ६ ई ८८2 हैदराबादकडे सकाळी ८.४० वाजता.