प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली सभा संपन्न
नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे संस्थापक, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत, मराठा क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त २३ मार्च रोजी एपीएमसी मधील माथाडी भवन येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माथाडी नेते तथा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ‘माथाडी युनियन'चे कार्याध्यक्ष तथा ‘राष्ट्रवादी श.प.'चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, कायदेशीर सल्लागार नगरसेविका ॲड. भारती पाटील, संयुवत चिटणीस आनंद पाटील, दिलीप खोंड, सेक्रेटरी आमदार मनोज जामसुतकर, उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, ‘माथाडी हॉस्पिटल'चे मुख्य वैद्यकीय अधिकारी हणमंतराव पाटील, नगरसेवक शिवाजी खोपडे, नगरसेविका शुभांगी पाटील, ‘माथाडी पतपेढी'चे चेअरमन वि्ील धनावडे, ‘माथाडी ग्राहक सोसायटी'चे चेअरमन बाजीराव धोंडे, खंडू राऊत तसेच तमाम माथाडी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. अण्णासाहेब पाटील यांचा आचार, विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार कार्य करणे आणि ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक घटकाने सत्याने काम करणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली आहे. बदलत्या परिस्थितीत कै. अण्णासाहेब पाटील यांनी महान कष्ट आणि त्यागातून स्थापन केलेली संस्था, सलग्न संस्था, माथाडी कायदा, माथाडी बोर्ड आणि माथाडी कामगारांचा न्याय हक्क टिकवायचा असेल तर प्रत्येक घटकाने जबाबदारी आणि न्यायाने काम करावे, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले.
माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी कै. अण्णासाहेब पाटील यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्श शिकवणुकीनुसार काम करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे. आम्ही सर्वजण मिळून पदाधिकारी काम करु, अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युनियनचे संयुक्त सरचिटणीस तथा जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.