म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
जिल्हाधिकारी, कोषागार कार्यालयामधील १२० दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप
ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय-ठाणे, आवास फायनान्स लिमिटेड, राजस्थान सडक सुरक्षा सोसायटी आणि स्टीलबर्ड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तसेच कोषागार कार्यालयामधील एकूण १२० दुचाकी चालकांना हेल्मेटस्चे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेश कोलुंगाडे, जितेन कपानी, डॉ. वैभव ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व आस्थापनांवरील दुचाकी चालविणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयात येताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.