ज्युनिअर केजी वर्गासाठी २४ मार्च पासून प्रवेश प्रक्रिया

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये इंग्रजी माध्यमासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षाकरिता ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश प्रक्रिया २४ मार्चपासून सुरु हेाणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने २०२२ मध्ये इंग्लिश मिडीयम शाळा लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये सुरु करण्यात आली. शाळेचे यंदा चौथे वर्ष सुरु आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये ज्युनियर के. जी. वर्गाची ४० विद्यार्थ्यांची (२० मुले, २० मुली) क्षमता असणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य राहील. या वर्गाची २४ मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

दरम्यान, ज्युनियर के.जी. मध्ये प्रवेश घ्यावयाच्या बालकाचा जन्मदिनांक १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय ४ वर्ष आणि कमाल वय ५ वर्ष ५ महिने इतके असणे गरजेचे आहे.  

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रेः बालकाचे जन्म प्रमाणपत्र, बालकाचे आधारकार्ड, पालकांचे आधारकार्ड अथवा मतदार ओळखपत्र, पालकांचे वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला (१ लाखांपेक्षा कमी) तसेच पालकांचा रहिवास पुरावा (रहिवासी दाखला, विजबील, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, रेशनिंग कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र), प्रवेश अर्ज कार्यालयातून घेतेवेळी बालकाचा जन्म दाखला झेरॉक्स आणि पालकांचा रहिवासी पुरावा सोबत असावा. तरच प्रवेश अर्ज दिला जाईल.

प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाणः लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, दांडेकर हॉस्पिटल-आगरी समाज हॉल समोर, पनवेल-४१०२०६. संपर्कः प्राजक्ता महाडिक (८८७९८८०२२६), तेजस खोचे (७७७६८५९५४९).

प्रवेश प्रक्रियाः
प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख -२४ मार्च २०२५
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख -९ एप्रिल २०२५.
प्रवेश फॉर्म वाटप-स्विकरण्याची वेळ - सकाळी १० ते दुपारी १
ज्युनियर के.जी.करिता लॉटरीची तारीख-वेळ   - १६ एप्रिल २०२५, सकाळी ११ वाजता. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

चला, पाणी वाचवूया-भविष्य सुरक्षित करुया