प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
१२ वर्षीय मयंकचा नवा विक्रम
उरण : उरणकर १२ वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी असे २४ कि.मी. अंतर पोहून पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. याआधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा अंतर पोहून पार केले आहेत. तर तिनही प्रवाह प्रथम पोहून पार करण्याचा नोंद मयंकच्या नावाने झाली आहे.
उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी असे २४ कि.मी. अंतर ७ तास २१ मिनिटे ६ सेकंद या वेळेत पार करुन आपल्या विक्रमची नवी नोंद केली आहे. ८ डिसेंबर रोजी पहाटे ३ः५५ वाजता भाऊचा धक्का येथून मयंकने समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पान्याच्या लाटा त्यातच मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढत त्याने निर्धारीत वेळेत विक्रम पूर्ण केला आहे. मयंकने याआधी धरमतर ते करंजा जेट्टी १८ कि.मी. अंतर पोहून पार केले. सदर प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू होता. तर घारापुरी ते करंजा जेट्टी असे १८ कि.मी. अंतर पोहून पार करणारा देखील तो पहिला जलतरणपटू ठरला. सलग ३ वर्षे मयंकने ३ समुद्रीय प्रवाह पोहून पार केल्याने तो या तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. मयंकच्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने दखल घेत त्याच्या विक्रमची नोंद केली आहे. तर करंजा जेट्टी येथे विक्रम पूर्ण होताच करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषात अभिनंदन केले.