प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
माजी आमदार सुभाष भोईर यांचा ‘भाजपा'मध्ये प्रवेश
डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. त्यातच ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार सुभाष भोईर, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘भाजपा'मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सुभाष भोईर यांच्यासमवेत उंबार्ली मधील उपतालुकाप्रमुख सुखदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख सुमित सुभाष भोईर, ‘कल्याण विधानसभा'चे युवा अधिकारी सुरज जाधव, ‘दिवा'चे युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, प्रसाद पाटील, ‘शिळ'चे विभागप्रमुख विश्वनाथ पाटील, दिवा शिवसेना शहर सचिव उमेश राठोड, युवासेना उपशहर अधिकारी सुयोग राणे, विराज सुर्वे, दिवा विभाग अधिकारी आकाश शुक्ला, अक्षय भोईर, धनंजय बेडेकर, रविंद्र पाटील, सचिन मढवी, दिपेश चव्हाण, युसूफ खान,बद्रेश आलम खान, चित्रा बाविस्कर, कळवा-मुंब्रा विधानसभा प्रमुख अश्विन म्हात्रे, संतोष जयस्वाल, युवराज बेडेकर, प्रतिक म्हात्रे, भगवान पाटील, देवेंद्र पाटील, केवल पाटील, योगेश भोईर, प्रथमेश गायकर यांनीही ‘भाजपा'मध्ये प्रवेश केला.