मॉडर्न स्कुलचे मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांचा सेवापुर्ती समारंभ संपन्न
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कुलमध्ये तब्बल २५ वर्षे कार्यरत असलेले मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांचा सेवापुर्ती समारंभ २७ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी एकूण ३७ वर्षो तर संस्थेच्या वाशी येथील शाखेत २५ वर्षे सेवा केली. आजवर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले असून संस्थेसाठी आणि शाळेसाठी त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. सेवापूर्ती कार्यक्रमप्रसंगी रयतसेवकांसह माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी जागृत केल्या. मॉडर्न स्कुलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्था-सातारा उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले, रयत शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य दशरथ भगत, रयत शिक्षण संस्था रायगड विभागीय अधिकारी विलासराव जगताप, माजी विदयार्थी गणेश पाटील, उद्योजक गटकळ, प्राचार्या सुमित्रा भोसले विद्यालयाचे विभागप्रमुख, रयत सेवक यांच्यासह रवींद्र वाघ यांचे कुटुंबीय उपस्थित होते.