निवडणूक विषयक कामकाजाचा नमुंमपा आयुवतांकडून आढावा

नवी मुंबई : ‘राज्य निवडणूक आयोग'मार्फत नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ जाहीर करण्यात आली असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणुकीशी संबधित महापालिकेचे अधिकारी तसेच पोलीस, इतर सर्व प्राधिकरणांचे अधिकारी आणि ‘निवडणूक आयोग'मार्फत नियुक्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील सहा.निवडणूक अधिकारी यांची विशेष बैठक घेत निवडणूक कामकाज निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने सामुहिक भावनेने काम करावे, असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, डॉ. राहुल गेठे, सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, नमुंमपा निवडणूक विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे तसेच इतर प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.

राजकीय पक्षांना निवडणूक विषयक, आचारसंहिता नियमांबाबत माहिती...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी  निवडणूक विषयक संपूर्ण माहिती देत आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सुयोग्य उत्तरे देऊन शंका समाधान केले. यावेळी प्रथमतःच एका प्रभागात ४ सदस्य अशाप्रकारे बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक होत असल्याने एका मतदाराला आपल्या प्रभागातील अ, ब, क, ड अशा ४ उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. याकरिता आपल्यामार्फतही नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘पत्रकार परिषद'द्वारे माध्यम प्रतिनिधींशी सुसंवाद...
विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी नमुंमपा निवडणूकीविषयी सुसंवाद साधतांना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं.५.३० यावेळेत होणार असून मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० पासून होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.  निवडणुकीकरिता जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. २३ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ तसेच ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रे देण्यात आणि स्विकारण्यात येणार नाहीत, असे आयुवतांनी यांनी नमूद केले.

३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ नंतर निवडणूक चिन्ह नेमून दिले जाणार आहे. ३ जानेवारी रोजीच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नमुंमपा निवडणूक १११ सदस्य संख्येकरिता होत असून त्यासाठी २८ प्रभाग झालेले आहेत. त्यामध्ये २७ प्रभाग ४ सदस्यीय असून १ प्रभाग ३ सदस्यीय आहे. एवूÀण ९,४८,४६० इतकी एकूण मतदार संख्या असून त्यामध्ये ५,१६,२६७ पुरुष आणि ४,३२,०४० इतके स्त्री मतदार आणि १५३ इतर मतदार आहेत. यावेळी ४ सदस्यीय प्रभाग असल्याने एका मतदारास ४ सदस्यांना मतदान करावयाचे आहे, यादृष्टीने एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त ८०० ते ८५० मतदार असतील, याकडे लक्ष देण्यात आलेले आहे. एकूण २८ प्रभागांसाठी ११४१ इतकी मतदान केंद्रे कार्यान्वित असणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे रितीने पार पाडण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या ६२७५ कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त शिंदे यांनी यावेळी दिली.

निवडणूकीकरिता आठ विभाग क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित करण्यात आली असून प्रभाग क्र. १,२,३ करिता माता-बाल रुग्णालय इमारत दिघा याठिकाणी आणि प्रभाग क्र. ४,५,७ करिता सरस्वती विद्यालय सेवटर-५ ऐरोली याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असणार आहे.

प्रभाग क्र.६,८,९ करिता समाजमंदिर हॉल, सेवटर-७ घणसोली आणि प्रभाग क्र.१०,११,१२,१३ करिता आण्णासाहेब पाटील सभागृह, पहिला मजला, सेवटर-५, कोपरखैरणे येथे कार्यालय असणार आहे.

प्रभाग क्र. १४,१५,१९,२० याकरिता अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, सेवटर-१० सानपाडा आणि प्रभाग क्र. १६,१७,१८ करिता जलतरण तलाव संकुल, सेवटर-१२, वाशी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे.

प्रभाग क्र. २१,२२,२३,२४ करिता आगरी कोळी भवन, सेवटर-२४, नेरुळ याठिकाणी तसेच प्रभाग क्र. २५, २६,२७, २८ करिता ए विभाग कार्यालय बेलापूर भवन, सेवटर-११, सीबीडी-बेलापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अनाधिकृत बॅनर्स विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली असून महापालिकेच्या मालमत्तांसह शासकीय कार्यालये आणि इमारती तसेच सार्वजनिक आणि खाजगी जागांवरील राजकीय मजकूर हटविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मालमत्तांवरील उद्‌घाटन-भूमीपुजनाच्या कोनशिला तसेच राजकीय व्यक्तींची नावे असलेले फलक झाकून घेण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात आलेली आहे.

-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.

निवडणूक प्रक्रिया सुनियोजित रितीने पार पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग प्रमुखांना निवडणूक कामांच्या अनुषंगाने समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून आवश्यक कामे करण्याकरिता कर्मचारीवर्गही उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आचारसहिता अंमलबजावणी कक्षाचे समन्वयक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार काम पाहणार असून कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा आराखडयाचे काम अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे पाहणार आहेत. मिडीया सेल आणि एमसीएमसी कमिटीचे समन्वयक अधिकारी म्हणून मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे काम पाहणार असून निवडणूक खर्च विषयक कामकाजाची जबाबदारी मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका निवडणुकीत मेहता, सरनाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई