म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नेरूळच्या विक्रम सिंह अधिकारी यांची निवड
नवी मुंबई : पुणे येथे २ मार्च रोजी पार पडलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ७२ किलो वजन गटात १५७.५० किलो वजन उचलून नवी मुंबईच्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वेटिलिपटर विक्रम सिंह अधिकारी यांनी स्पर्धेत विजय प्राप्त केल्याने त्यांची १६-१८ मार्च दरम्यान नोएडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिािंपटग चॅम्पियनशिप आणि २०-२७ मार्च दरम्यान नवी दिल्ली येथील जवाहारलाल नेहरु स्टेडियमवर होणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स२०२५ च्या दुसऱ्या आवृत्तीत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
नेरूळचे रहिवासी असणाऱ्या विक्रम सिंह अधिकारी यांना मित्र आणि गुरुवर्य राकेश पाटील यांचे प्रशिक्षण लाभले आहे वल्कन हेल्थ क्लब, नेरूळ येथे नियमित सराव करणाऱ्या विक्रम सिंह यांनी पुढील राष्ट्रीय स्पर्धेतही पदक मिळवण्याचा निश्चय केला आहे.