प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
केडीएमसी मुख्यालयात सचिव कार्यलयात हे अर्ज भरण्यात आले. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध मानली जात असून याबाबत सोमवारी पार पडणार्या निवडणूक प्रक्रियेत अधिकृत घोषणा केली जाईल. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सभागृह नेते वरुण पाटील यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.