रिलायन्स फाउंडेशन स्कूल मध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

बदलापूर : मराठी दिनाचे औचित्य साधून रिलायन्स फाउंडेशन स्कूलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी दुसरे विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न झाले. या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीचे साईड प्रेसिडेंट आणि रिलायन्स फाउंडेशन स्कूलचे शालेय समितीचे अध्यक्ष रंगराजन सुंदराजन लाभले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रिलायन्स फाउंडेशन स्कूलचे मुख्याध्यापक आतिश क्षीरसागर यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून रिलायन्स फाउंडेशन स्कूलचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास सबनीस होते. या प्रसंगी कर्जत येथील ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इयत्ता दुसरीतील आरोही कोकाटे हिची नाट्यछटा सर्वांना भावली. मराठी दिनाचे महत्त्व दिव्या माडेवार हीने सांगितले. कानडा राजा पंढरीचा हा अभंग अर्णव झिंगे यांनी आपल्या बहारदार शैलीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर मराठी भाषेवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी इयत्ता सहावीच्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर नृत्य सादर केले. सोहम राजगे याने नाट्यछटा, तर  विवेक राजगे याने अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोने ही कथा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अनन्या पाचपुते हिने आईवर सादर केलेली स्वरचित कविता सर्वांना भावली; प्रज्ञा पवार हिने स्वरचित कथाकथन सादर केले. गंधार पाटक यांनी पु .ल. देशपांडे यांची माहिती या साहित्य संमेलनातून सादर केली. सेजल पोटफोडे हिने लेखक आणि कवी यांच्याबद्दल माहिती सांगितली.

रंगराजन यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रात राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे किंबहुना आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील मातृभाषा आपल्याला अवगत असली पाहिजे असे ठणकावून सांगून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य अतिश शिरसागर यांनी अशा प्रकारचे साहित्य संमेलन भरवून एक नवा पायंडा शाळेसाठी पाडल्याचे नमूद केले. प्रमुख पाहुणे दिलीप गडकरी यांनी अशा प्रकारचे साहित्य संमेलन मराठी दिनाचे औचित्य साधून शाळा शाळांमधून झाले पाहिजे, या कार्यक्रमात साहित्याचे सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केल्याबद्दल त्यांचे  कौतुक केले. सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी काव्या वाझे आणि प्रांजल राठोड यांनी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक साहित्यिकसंजय वझरेकर यांनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ज्युनिअर केजी वर्गासाठी २४ मार्च पासून प्रवेश प्रक्रिया