‘एका बटरची बेटर गोष्ट'चे महापौरांच्या हस्ते अनावरण

ठाणेः ठाणे महापालिका आणि साहिल आर्ट मोशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘बालरंगकर्मी' योजना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘एका बटरची बेटर गोष्ट' या लघुपटाचे अनावरण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले. ठामपा शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारची बालरंगकर्मी योजना राबविणारी ठाणे महापालिका महाराष्ट्रातील एकमेव महापालिका असल्याचे सांगत महापौर पिंपळोलकर यांनी सर्व बालरंगकर्मींचे कौतुक केले.

या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, नगरसेवक मुकेश मोकाशी, प्रशांत जाधवर, गट अधिकारी संगीता बामणे, बालकलाकार श्रेयस थोरात आदि उपस्थित होते.

कोणतेही काम हलहान किंवा मोठे नसते. ते प्रामाणिकपणे करणे महत्वाचे असल्याचे सांगत मी ही पाचवीत असताना कंदील तयार करुन ते आजुबाजुच्या लोकांना ५ रुपयांमध्ये विकल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले. ‘एका बटरची बेटर गोष्ट' लघुपट पाहिल्यावर त्यातील कथा माझ्या लहानपणाशी मिळतीजुळती असल्याचे भासले. लहानवयात कष्ट करुन आज इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सभागृह नेते हणमंत जगदाळे म्हणाले.

ठाणे महापालिका नेहमीच चांगल्या उपक्रमांना सहकार्य करीत असते. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. ‘एका बटरची बेटर गोष्ट' या लघुपटात सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय केला असून भविष्यात यातून नक्कीच कलावंत घडतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी व्यवत व्ोÀला. तर अतिरिक्त आयुवत प्रशांत रोडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई यांचे अभिनंदन केले.

‘बालरंग' योजनेचे यंदा चौथे वर्ष असून या माध्यमातून महापालिकेच्या पाचवी ते नववीतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना नाट्य, अभिनय, कॅमेरा हाताळणी, संवाद कौशल्य तसेच चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी निवडक विद्यार्थ्यांना संधी देत लघुपट तयार करण्यात आला असल्याचे साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ठामपा'ची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र