संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलाला आग 

ठाणेः  मानपाडा परिसरातील टिकुजीनी वाडी  येथील स्व. प्रमोदजी महाजन निसर्ग उद्यानाजवळ असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलात २७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, वनविभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने पावले उचलल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

२७ एप्रिल २०२६, रात्री अंदाजे ८ वाजून ३ मिनीटांनी ही घटना घडली. याबाबतची माहिती स्थानिक रहिवासी सोनाली चौधरी यांनी दिल्यानंतर  ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने हालचाली केल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान आणि १-फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.

ही आग ही संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलात, महापालिकेच्या निसर्ग उद्यानाजवळ लागली होती. ही आग पसरत असतानाच येऊर वनपरिक्षेत्राच्या आग नियंत्रण दलाच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. वनविभागाचे कर्मचारी आणि महानगरपालिकेचे अग्निशमन दल यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असून ‘कूलिंग'चे काम सुरू आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे जंगलाच्या आतील भागात आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरी येथील वादग्रस्त मलनिस्सारण प्रकल्पाची महापौर,आयुक्ताकडून पाहणी