वेस्ट-टू-एनर्जी सीबीजी प्रकल्प झोपडपट्टीवासीयांच्या मुळावर

नवी मुंबई : नवी मुंबई शहर विकासाच्या दिशेने झपाट्याने प्रगती करत असताना बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांना गती मिळत आहे. असे असताना वेस्ट-टू-एनर्जी सीबीजी प्रकल्प झोपडपट्टीवासीयांच्या मुळावर उठला आहे. या पार्श्वभूमीवर तुर्भे विभागातील शिवसेनाचे नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना निवेदन सादर करून साकडे घातले आहे.

तुर्भे विभागातील नगरसेविका सविता लगाडे (प्रभाग क्र. २०-अ), नगरसेविका अबोली कुलकर्णी (प्रभाग क्र. २०-ब), नगरसेवक सुरेश कुलकर्णी (प्रभाग क्र. २०-क), नगरसेविका सविता सांगळे (प्रभाग क्र. १४-ब) तसेच माजी नगरसेवकांनी संयुक्तपणे सदर निवेदन दिले. या निवेदनात वेस्ट-टू-एनर्जी व सीबीजी प्रकल्पामुळे झोपडपट्टीवासीयांच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या संवैधानिक अधिकारांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, बेलापूर विधानसभा क्षेत्रात कोणताही प्रकल्प राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात. संबंधित विषयावर लवकरच नवी मुंबई महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जनतेच्या सामाजिक हिताचे रक्षण करत कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कशेळी-काल्हेरमधील हजारो रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार