प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मानपत्र प्रदान
ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३५ व्या वर्धापन दिनी मालगुंड, रत्नागिरी येथील केशवसुत स्मारक मध्ये भव्य सोहळ्यात ' कोमसाप 'चे माजी मुंबई उपनगर अध्यक्ष लेखक आणि समीक्षक शिवाजी गावडे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संतत ३५ वर्षे केलेले संघटनेतील कार्य, अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी केलेले कार्य आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत दिलेले अत्यंत मोलाचे योगदान याची दखल घेऊन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.