‘लोकांनी प्लास्टीकचा कमीत कमी वापर करावा'

नवी मुंबई : खनिज तेल प्लास्टिकपासून मिळते हे पाहून कुठलेही सरकार प्लास्टिक बंदी करणार नाही; तरी लोकांनी कमीत कमी वापर करावा असे आवाहन सौ गार्गी गीध यांनी ‘कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था'च्या विज्ञान दिना निमित आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या आधी प्लॅस्टिकची निर्मिती सुरु झाली त्याबाबत निर्मिती का करावी, ह्याची माहिती देताना त्यांनी साहेब लोकांना (युरोपियन) बिलियर्ड खेळाचा खूप नाद होता. त्यासाठी जो बॉल हा हत्तीच्या दारापासून बनविला जात असे, त्यामुळे हत्तीची शिकार जास्त प्रमाणात होत होती. त्यामुळे लोकात प्रक्षोभ वाढत होता. त्यासाठी शास्त्रज्ञ यांनी संशोधन करून प्लास्टिक चा शोध लावला. हेच प्लास्टिक आता मनुष्य जातीला घातक ठरले आहे हे त्यांनी अनेक उदाहरण देऊन समजावले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की घरातून बाहेर जाताना कापडी पिशवी, हातरुमाल व स्टीलची पाण्याची बाटली जवळ ठेवा, कागदी किंवा प्लास्टिकचे कप वापरू नका. यावेळी महापालिकेचे अधिकारी विजय नाईक यांनीही या भाषणाचा अनुभव घेऊन आपणही ह्या क्षेत्रात काम करतो; पण प्लास्टिक बाबत प्रथमच एवढी माहिती मिळाली असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. ललिंगकर ह्यांनी वाचनालयाची थोडक्यात ओळख करून दिली. कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, हॅप्पी होम ग्राहक संघ व मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई शाखा एकत्र येऊन हा विज्ञान दिन साजरा केला.             

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे मध्ये ‘पॉड टॅक्सी'चा पायलट प्रकल्प