दुर्गाडी किल्ला येथे नागाला जीवदान

कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या नागाला सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. यानंतर या नागाला नैसर्गिक आधिवासात सोडण्यात आले.  

सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात  २९ जानेवारी रोजी दुपारी साडेपाच फुटी लांब नागाची आणि मंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान, सदर ठिकाणी किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहोचले असता त्यांची चाहूल लागल्याने मंुगूस पळून गेले. तर नागाचा रुद्रावतार पाहता मजुरांची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान राखत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. यानंतर मोरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागाला पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाच्या तिरिपेसाठी दगडी पायरी परिसरात उबेसाठी आला असावा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिला सक्षमीकरण हेच ‘भाजपा'चे ध्येय - आ. प्रशांत ठाकूर