सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये विकसित करणार एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क
‘मनसे'चे नगरसेवक राज ठाकरे यांच्या भेटीला
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ‘मनसे'चे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांनी १७ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या विजयी उमेदवारांचे औषण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
‘मनसे'चे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश लांडगे, शीतल मंढारी, प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, रसिका पाटील तसेच राहुल कोट यांनी आणि ‘मनविसे'चे शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या पत्नी स्वप्नाली केणे यांनी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय प्राप्त केला. त्यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसे नेते माजी आमदार राजू पाटील, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, विनोद केणे, हर्षद पाटील, अरुण जांभळे, सचिन पोपलाईत, आदि पदाधिकारी उपस्थित होते.