देशातील पहिली ‘एफ फोर' स्ट्रीट सर्कटि शर्यत लवकरच नवी मुंबईत

नवी मुंबई : स्वच्छता विषयक आणि इतर विविध पुरस्कारांसह देशभरातील मोठमोठ्या संस्थांनी देशातील सर्वोत्कृष्ट महापालिका म्हणून गौरविलेले नवी मुंबई शहर आता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर झळकण्यासाठी सज्ज होत आहे. नवी मुंबईत जागतिक दर्जाचे मोटरस्पोर्टस्‌ क्रीडा प्रकार आणण्यासाठी आरपीपीएल या संस्थेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

याचा आनंद आणि अभिमान आहे. मा.मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, जागतिक दर्जाचे मोटरस्पोर्टस्‌ साठी आरपीपीएल सोबत केलेला सामंजस्य करार महाराष्ट्राला आशियाची मोटरस्पोर्टस्‌ राजधानी बनवण्याच्या परिवर्तनात्मक प्रवासाची सुरुवात असून त्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई शहरामध्ये भारतातील पहिल्यावहिल्या ‘एफ फोर' स्ट्रीट सर्कटि शर्यतीचे आयोजन केवळ खेळाबद्दल नाही तर ते जागतिक ओळख निर्माण करण्याबद्दल तसेच पर्यायाने पर्यटनाला चालना देण्याबद्दल आणि तरुणांना प्रेरणा देण्याबद्दलचे महत्वाचे पाऊल आहे. यासाठी सदरचा उपक्रम नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई आणि नाशिकमधील पत्रकारांवरील हल्ल्याच्या नवी मुंबईतील पत्रकारांकङून निषेध, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी