महाराष्ट्र वक्फ मंडळावर फैयाज खान यांची नियुक्ती  

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने फैयाज खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम २३(१) अंतर्गत करण्यात आली आहे.  

सिडकोमध्ये कार्यरत असताना फैयाज खान यांनी वसाहत विभाग, संगणक प्रणाली विभाग तसेच पणन विभागामध्ये धोरणात्मक विचारसरणीच्या आधारे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली. धोरण व रणनीती आखणी, नागरिकाभिमुख व वापरकर्ता-सुलभ वेब पोर्टल्सची निर्मिती, एसएपी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी तसेच कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक करण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.  

फैयाज खान हे स्थापत्य अभियंता असून त्यांनी एमबीए (मार्केटिंग), एलएलबी तसेच एपीजीडीयूएम या पदव्या संपादन केल्या आहेत. तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि कायदेशीर ज्ञानाचा समतोल व प्रभावी वापर करण्याची त्यांची क्षमता ही त्यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्य अधिक गतिमान, पारदर्शक व परिणामकारक होऊन वक्फ मालमत्तांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि विकास अधिक प्रभावीपणे साध्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा दिल्लीत गौरव