सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीमशक्तीची मागणी

कल्याण : सरन्यायाधिश भुषण गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा, अपमानकारक कृतीचा व जातीय प्रवृत्तीचा भिमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून या हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भीमशक्ती  संघटनेचे संस्थापक, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अपेक्षा दळवी यांच्या शिष्टमंडळाने  कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी  चळवळीचे  नेते  अण्णा रोकडे,  बाळ  भालेराव, अरुण  पठारे,  माजी नगरसेवक भीमराव  डोळस,  भीमशक्तीचे  रमेश साळवे, मंगेश इंगळे,  सचिन भोसले,  अशोक पगारे, सचिन खरात,  आदर्श  दळवी, अभिमन्यू गायकवाड, विलास सकपाळ, सुरेश  गमरे,  सोमा  राठोड, आशा  सोनवणे कुमार कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टात आजपर्यंत सरन्यायाधीश या पदावर अनेक उच्चवर्णीय आले. मात्र देशाचं इतिहासात  एक अनु. जातीची व्यक्ती पहिल्यांदा उच्च पदावर पोहचल्याने जातीय वाद्यांना हे पटलेले नाही. जातीय मानसिकता व विचारसरणी असलेला अ‍ॅड राकेश किशोर हा वकिली व्यवसायाला लांछन लावणारे आहे. ते भारतीय संविधानातील नितीमुल्यांना मानत नाही. जातीय द्वेष भावना जास्त प्रमाणात दिसून येते. तरी या द्वेषमुलक विमारसणी व अनु. जातीच्या सरन्यायाधिशच्या केलेल्या अशोभनीय गैरवर्तनाबद्दल देशद्रोह आणि अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध २०१५ सुधारित अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची देशातील  पहिली मागणी भीमशक्तीने केली असून गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अ‍ॅड. अपेक्षा दळवी यांनी दिला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महापालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे