ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली
नवी मुंबई-:राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या उच्च प्रतीच्या कांद्याचे उत्पादन घटले असून वाशीतील कृषीउत्पन्न बाजारात फक्त २०ते २५% उच्च प्रतीच्या कांद्याची आवक होत असून या कांद्याला ३० ते ३५ रु प्रतिकिलो दर भेटत आहे.तर चांगला कांदा बाजारात येण्यासाठी अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कांदा बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नवीन पीक घेण्यास सुरुवात केली.त्यात कांदा उत्पादन देखील सुरू आहे.मागील।दीड दोन महिन्यांपूर्वी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात जुना कांदा विक्री साठी बाजारात उपलब्ध झाला होता.मात्र आता या कांद्याची आवक पूर्णपणे संपली असून बाजारात नवीन कांदा दाखल होत आहे.मात्र नवीन पिकाच्या कांद्याच्या दर्जा योग्य येत नसल्याने बाजारात उच्च प्रतीच्या कांद्याची आवक घटली आहे.रोज २० ते २५% च चांगला कांदा दाखल होत आहे.तर ७० ते ७५%कांदा हलक्या प्रतिचा दाखल होत आहे. तर उच्च प्रतिच्या कांद्याला अधिक मागणी आहे व पुरवठा कमी असल्याने या कांद्याच्या दरात आवक नुसार वाढ होत असते. शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी कृषीउत्पन्न बाजारात उच्च प्रतीचा कांदा ३०ते ३५ रु.प्रतिकिलो विकला गेला व हलका कांदा १० ते २२ रु प्रतिकिलो पर्यत विकला गेला असून बाजारात ११५ गाड्या कांद्याची आवक झाली होती अशी माहिती कांदा बटाटा मार्केट मधील व्यापारी दिगंबर राऊत व मनोहर तोतलानी यांनी दिली.