प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
भिवंडी रोड, आसनगांव, बदलापूर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत योजनेतून करा
भिवंडीः भिवंडी, आसनगांव, बदलापूर या शहरांचा झपाट्याने विकास होत असून या शहरांमध्ये नागरी वस्ती वाढल्याने प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळाव्या यासाठी या तिन्ही रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत पुनर्विकास करा, अशी मागणी ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे यांची निवेदनाद्वारे केली आहे.
नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकांना स्वातंत्र्य सेनानींची नावे द्या...
रायगड जिल्ह्यातील नेरळ आणि कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वतंत्र सेनानींची नावे द्यावी, अशी मागणी देखील खा. सुरेश म्हात्रे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकाला ‘स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा वीर हिराजी गोमाजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक' असे नामकरण करण्यात यावे. तसेच कर्जत रेल्वे स्थानकाला ‘स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक' असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी खासदार म्हात्रे यांनी केली आहे.
नेरळ आणि कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वातंत्र्य सेनानींची नावे दिल्यास या महनीय व्यवतींच्या कार्याचा गुणगौरव होणार असून त्यामुळे स्थानिक युवक आणिा नागरिकांना प्रेरणा मिळेल. त्याअनुषंगाने आपण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे नामकरणाची मागणी केली आहे, अशी माहिती खा. सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.