दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त

नवी मुंबई : येत्या 2 ऑक्टोबर रोजी दस-याच्या दिवशी होणारा दुर्गादेवीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन संपुर्ण शहरात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी देखील =देवी विदार्जनाच्या दिवशी शांततेत दुर्गादेवीचे विसर्जन करावे असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडुन करण्यात आले आहे.    

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 816 सार्वजनिक तर 2409 घरगुती देवींची स्थापना करण्यात आली आहे. यात 648 मुर्ती / घट असून, 41 घट आहेत. तसेच 124 फोटो /प्रतिमा असून तीन ठिकाणी फक्त दांडिया आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.    

त्यासाठी 7 पोलीस उपआय्क्तु,11 सहाय्यक पोलीस आयुक्त, 72 पोलीस निरीक्षक, 270 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक तसेच 2200 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय 9 स्ट्रायकिंग फोर्स, 2 क्यूआरटी, 2 आरसीपीचे फ्लाटून तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन स्थळ, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महत्वाच्या ठिकाणी फिक्स पाँईट, पेट्रोलिंग तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ-1 मध्ये 249, परिमंडळ-2  236 आणि परिमंडळ-3 मध्ये 339 विसर्जनस्थळावर दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे. पोलीस आयुक्तालयाकडून महत्वाच्या विसर्जन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील पोलिसांचा देवी विसर्जन मिरवणुकांवर वॉच राहणार आहे.    

योगेश गावडे (सहाय्यक पोलीस आयुक्त-विशेष शाखा)    
दुर्गादेवीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन संपुर्ण शहतात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी देखील शांततेत देवीचे विसर्जन करावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांना कुणी संशयीत व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दसऱ्यासाठी फुलबाजार सजला, पावसामुळे फुलांचे भाव कडाडले