तुर्भे येथे लवकरच कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्प 

नवी मुंबई : नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटीची ओळख हि स्मार्ट सिटी सारखी प्रत्यक्षात दिसण्याकरिता सतत प्रयत्न करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई सारख्या महापालिकेचा स्वतःचा असा कचऱ्यापासून निर्माण होणारा विजनिर्मिती प्रकल्प असावा असे ध्येय समोर ठेऊन अनेक वर्ष काम करत होत्या. त्यानुसार त्यांनी 25 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिलेले होते. सदर पत्रामध्ये नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कच-याच्या समस्येच्या पार्श्वभुमीवर तुर्भे येथे "कच-यापासुन वीज निर्मीती प्रकल्प" (Waste-to-Energy Plant) उभारण्याबाबतची मागणी केले होती. 

त्यानुसार विषयांकित कामाबाबत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी 11 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. रवींद्र भराटे (अवर मुख्य सचिव, नगरविकास - 2) यांना या बाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने डॉ.रवींद्र भराटे यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना सदर प्रकल्पबाबत सविस्तर प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करण्याचे निर्देश दिले होते. सदर प्रकरणाचा सतत पाठपुरवठा करून अखेर 5 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर विकसित करणे या कामाचे Letter of Award (LOA) M/s R&B Greentech LLP यांना देण्यात आले असुन सदर कामाची संक्षिप्त टिप्पणी, प्रशासकीय मंजुरी आदेश, LOA देण्यात आला. त्याची अधिकृत माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 30 डिसेंबर रोजी अवर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना सुपुर्द केली. 

लवकरच नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी लोकसहभागातून (PPP) तत्वावर सुरु केला जाणार असल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली. तसेच सदर प्रकल्प उभारण्याकरिता अंदाजित 1800 ते  2000 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, सदर प्रकल्प नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सदर पत्रकार परिषदेत  उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी सदर विषयाबाबत मार्गदर्शन केले व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या हितासाठी आणलेल्या प्रकल्पाचे समाजसेवकांनी स्वागत केले. 

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आर. बी. बर्वे, भरत गोलतकर, निखिल भंडारी, प्रवीणकुमार देशमुख, मधुकर कोळगे, विनायक तलाठी, श्रीकांत पत्की, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, विकास सोरटे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, मालती सोनी, संजय ओबेरॉय, आरती राऊळ, किरण वर्मा, शीतल जगदाळे, आदि  उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट