प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्यासाठी चाचपणी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने ‘सिडको'ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विमानतळावर तिसरी समांतर धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता तपासणी करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया ‘सिडको'ने सुरु केली आहे. यासाठी पात्र आणि नामांकित एकल संस्था अथवा संयुक्त भागीदार संस्थाकडून निविदा मागवण्यासाठी स्वारस्याची अभिरुची (Rलिेू दिी झ्ीदज्देीत्) तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यातील प्रवासी आणि कार्गो वाहतुकीचा अंदाज, पायाभूत सुविधांची गरज, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी तसेच दीर्घकालीन विमान वाहतूक मागणी लक्षात घ्ोऊन तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता आणि उपयुक्तता तपासली जाणार आहे.
सध्या मुंबई आणि ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर)'ला प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा देत असून त्याची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे ५० ते ५५ दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष इतकी मर्यादित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ‘मुंबई महानगर प्रदेश'साठी नियोजित मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम कार्यरत होणार असून, त्यातून एकत्रितपणे सुमारे १५० एमपीपीए क्षमतेची सेवा उपलब्ध होईल.
दरम्यान, २०३७ नंतरच्या दीर्घकालीन विमान वाहतूक मागणीचा विचार करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याचा पर्याय सध्या तपासण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन कार्गो हाताळण्याच्या क्षमतेचा आहे. या विमानतळाची रचना दोन समांतर आणि स्वतंत्र धावपट्ट्यांसह करण्यात आली असून ४ परस्पर जोडलेल्या प्रवासी टर्मिनल्सचा समावेश आहे.
नवी मुंबई विमानतळाचा विकास पाच टप्प्यांमध्ये केला जात असून पहिला आणि दुसरा टप्पा (२० एमपीपीए क्षमता) पूर्ण झाला आहे. देशांतर्गत विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, ‘मुंबई महानगर प्रदेश'च्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक गरजांना चालना देणारा ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने ‘सिडको'ने घ्ोतलेला सदर निर्णय ‘सिडको'च्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा नियोजनाची साक्ष देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराच्या दीर्घकालीन विकासाच्या गरजांनुसार सातत्याने विकसित होत राहील, याची खात्री करण्यासाठी सदरचे पाऊल उचलण्यात आले आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.