नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी'ला धक्का

नवी मुंबई : नवी मुंबई मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा बसला होता. ‘राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (सीआर) पाटील आणि त्यांचे चिरंजीव विनीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा ‘शिवसेना'चे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिवसेना पक्ष'मध्ये २९ सप्टेंबर रोजी प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देऊन चंद्रकांत पाटील यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान, माथाडी कामगारांच्या संघटनेमध्ये पूर्वीपासून सक्रिय असणारे आणि प्रकल्पग्रस्त आणि ववॉरी मालकांसाठी नेहमीच झगडणारे नेते म्हणून परिचीत असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा शिवसेना पक्षप्रवेश ‘राष्ट्रवादी एसपी गट'ला मोठा धवका मानला जात आहे.

या पक्षप्रवेशाप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी, विलास भोईर, आदि उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रवेशानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी पक्ष अथवा इतर कोणताही नेता यांच्या विषयी आपल्याला कोणतीच तक्रार अथवा त्यांच्याविषयी नारजी नाही. फवत आणि फवत आपण जनतेच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ‘शिवसेना'मध्ये पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

वास्तविक पाहता नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, ववॉरीचा प्रश्न, माथाडी बांधवांचे प्रश्न, एलआयजीतील रहिवाशांचे प्रश्न यासह नवी मुंबईकरांच्या इतर संबंधित विषयाच्या अनुषंगाने माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्याशी वेळोवेळी चर्चा झालेली आहे. त्यावेळी नामदार शिंदे यांनी कधीही माझा पक्ष आणि पदाबाबत आकस बाळगला नाही. जो नेता पक्षपात न करता फवत लोकांसाठी धावून जातो, लोकांच्या कामाबाबत ना. एकनाथ शिंदे यांची असलेली तळमळ मी जवळून बघितली आहे. त्यामुळे अशा नेत्याच्या नेतृत्वात आपली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी मजबूत होऊ आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकवू या अपेक्षेनेच शिवसेना पक्षप्रवेश केला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

१० दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवा; अन्यथा "कामबंद आंदोलन मोर्चा